ग्रामपंचायतमध्ये झालेल्या भ्रष्ट्राचाराची चौकशी करा ; वसंतवाडी ग्रामस्थांची मागणी

download 13

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वसंतवाडी या ग्रामपंचायतीवर सरपंच व तत्कालिन ग्रामसेवक हे त्या पदावर कार्यरत नसतांना ग्रामपंचायतीला मिळालेल्या विविध निधीमध्ये भ्रष्ट्राचार झाला आहे. याबाबत संबंधीतांची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी सरपंच व ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्याकडे  निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी सरपंच वच्छला पाटील, उपसरपंच भिमराव निकम यांच्यासह ईश्‍वर चव्हाण, भागवत पवार, अरूणा सोनवणे, अनिता चिमणकारे, बाबुराव पाटील, सुधाकर पाटील, माधव पाटील, समाधान चव्हाण, ज्ञानेश्‍वर चव्हाण आदी उपस्थित होते.

 

निवेदनात म्हटले आहे, की १४वी वित्त आयोग योजना सुरू झाल्यापासून ते सन २०१८ पर्यंत गावात कोणतेही विकास काम करण्यात आलेले नाही. संबंधीत योजनेचे खाते सरपंच/ग्रामसेवक यांच्या सहीने आहे. परंतू, तत्कालिन सरपंच व तत्कालिन ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीला पदावर कार्यरत नसतांना म्हणजे ग्रामसेवक २०१६ मध्ये बदली होवून गेले असून देखील २०१६  ते २०१८ या वर्षाचे सर्व अनुदान साधारण २५ लाख रूपये सदर खात्यातून काढलेले आहे. यासोबतच स्वच्छ भारत मिशन योजनेत देखील खोटे लाभार्थी दाखवून १२ हजार प्रमाणे ३००  लाभार्थ्यांचे ३६ लाख रूपये काढले आहेत. या योजनेत लाभ घेण्यासाठी ग्रामस्थांनी अर्ज केला असता लाभ घेतल्याचे सांगण्यात येते. तर भारत निर्माण योतजेतंर्गत सन २००८ पासून आजपर्यत ही योजतना अपूर्ण स्थितीत आहे. सदर योजनेत बांधकाम केलेल्या पाण्याच्या टाक्‍यांमध्ये पाणी टाकून गावाला पाणीपुरवठा करण्यात आलेला नसून एकदा पाणी भरण्याचा प्रयत्न केला असता  त्या गळत असल्याचे पाहण्यास मिळाले. संबंधीतानी  सरकारी पैशांचा दुरूपयोग केल्याने गावाला विकासापासून वंचित ठेवल्याने सदर रक्‍कमेची वसुली करून फौजदारी गुन्हा करण्याची मागणी करण्यात आली आहे

Add Comment

Protected Content