मयुर कॉलनीतील हत्याकांड प्रकरणाच्या तपासात अनेक बाबी पुढे येणार; पो.नि.बडगुजर यांची माहिती

जळगाव प्रतिनिधी । पिंप्राळा परिसरातील मयुर कॉलनीत मालमत्ता हडपण्याच्या कारणावरून दीराकडून कुऱ्हाडीने वहिनीची हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली होती.  पिंप्राळा तलाठी यांनी मिळकतीवर अतिरिक्त नाव लावल्याच्या कारणावरून हत्या करण्याचा आल्याचा आरोप मयत विवाहितेच्या बहिणीने केला होता. अटकेतील संशयीत दिपक याची पेालिस केाठडीत कसुन चौकशी सुरू असून इतर बाबी तपासात पुढे येतील असे, निरीक्षक बडगुजर यांनी माहिती देतांना सांगीतले. 

दीपक लोटन सोनार (३८) असे संशयित आरोपीचे नाव आहे. दिपकने २१ मे रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास भावाची पत्नी योगिता मुकेश सोनार (वय ३९, रा. मयूर कॉलनी, पिंप्राळा) यांचा डोक्यात कुर्‍हाडीने हल्ला हत्या केली होती. योगिता मुकेश सोनार यांच्या हत्त्ये मागे पिंप्राळा तलाठी यांनी मिळकतीच्या सातबारा उताऱ्यावर सासूचे नाव लावल्यावरुन खुन झाल्याचा आरोप केला हेाता. अटकेतील संशयीत दिपक सोनार याच्याकडून पेालिसांनी गुन्ह्यातील कुऱ्हाड जप्त केली असून त्याची चौकशी सुरु आहे. कुटूंबीयानी केलेल्या आरोपा प्रमाणे, ६ मे रेाजी पिंप्राळा तलाठी यांनी दिलेला उताऱ्यात प्रमिला सोनार यांचे नाव नमुद आहे. पोलिसांनी दोन दिवसांच्या पेालिस कोठडीत संशयीतांची चौकशी सुरू केली असून गुन्ह्याशी निगडीत पुरावे संकलनाचे काम सुरु होते. कुटूंबीयांनी केलेल्या आरेापा नुसार तपासात आणखी काही आढळून आल्यास त्या अनुषंगाने पुढील तपास सुरु राहिल असे निरीक्षक बडगुजर यांनी सांगीतले. उद्या संशयीत दिपक सोनार याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Protected Content