Home Cities अमळनेर ज्योती भोई यांच्या आत्महत्येने खळबळ

ज्योती भोई यांच्या आत्महत्येने खळबळ

0
104


अमळनेर प्रतिनिधी । येथील राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणार्‍या ज्योती धनराज भोई यांनी स्वत:च्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

ज्योती भोई या राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवती जिल्हाध्यक्षा म्हणून कार्यरत होत्या. विविध राजकीय व सामाजिक प्रश्‍नांवर आक्रमक भूमिका घेतल्याने त्या नेहमी चर्चेत असत. गत काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आज पहाटे त्यांनी आपल्या राहता घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

याबाबत समाधान भोई यांनी अमळनेर पोलिसात खबर दिली की, ज्योती हिने घरातील जिन्याच्या रेलिंगला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. या खबरीवरुन अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन केल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजले नसले तरी यामुळे शहरात खळबळ उडाली असून राजकीय व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound