जननी नेत्र आयु योजनेंतर्गत महिलांना नेत्रतपासणीत सवलत

जळगाव (प्रतिनिधी)। सारखे डोकं दुखत लांबचे, अस्पष्ट दिसते, स्वयंपाक घरात काम करताना स्पष्ट दिसत नाही, डोळ्यात सारखे पाणी येते अशा अनेक डोळ्यांच्या तक्रारी महिला करीत असतात. परंतु कुटुंबातील महिला स्वतःच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून कुटुंबाकडे अधिक लक्ष देत असते. डोळा हा शरीरातील अतिशय नाजूक व संवेदनशील अवयव आहे. महिला मात्र डोळ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत असतात. महिलांमध्ये डोळ्यांच्या काळजीबाबत जनजागृती व्हावी व नियमित तपासणी करण्यासाठी जागतिक महिला दिना निमित्त केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित मांगीलालजी बाफना नेत्रपेढी व चिकित्सालयतर्फे जननी नेत्रआयू योजना सुरू होत आहे.

या योजनेअंतर्गत डोळ्यांच्या तपासणीत 50 टक्के सवलत दिली जाणार आहे. तसेच डोळ्यांच्या शस्त्रक्रियेत विशेष सवलत दिली जाणार आहे. सदर योजना 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिना पर्यंत राहणार आहे. महिलांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन प्रकल्प प्रमुख सचिन चोरडिया, सह प्रकल्प प्रमुख डॉ. धर्मेंद्र पाटील, संचालक सज्जनराज बाफना, अनुया कक्कड, तुषार तोतला, शिवाजी भोईटे यांनी केले आहे.

Add Comment

Protected Content