जिल्हा शासकीय महाविद्यालयासमोरून तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोरील मुख्य गेटजवळून एका तरूणीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १२ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी रविवारी १७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मंगेश शंकर कोळी (वय-२१) रा. चिंचपुरा ता. पाचोरा हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. पेंटरकाम करून आपला उदरनिर्वाह करतो. कामाच्या निमित्ताने मंगेश कोळी हा तरूण १२ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीएम २२५०) ने जळगाव शहरातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसमोर आलेला होता. त्यावेळी त्याने दुचाकी रूग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावलेली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली.

 

हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरूणाने सर्वत्र शोध घेतला असता दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर रविवारी १७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल पल्लवी मोरे करीत आहे.

Protected Content