बेंडाळे महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी हाताने घडवले “इको फ्रेण्डली बाप्पा”

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  डॉ. आण्णासाहेब जी डी.बेंडाळे महिला महाविद्यालयात आय. क्यू. एस. सी. अंतर्गत दोन दिवसीय पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा १६ व १७ ला घेण्यात आली. यात मोठ्या संख्येने विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यशाळेत विद्यार्थिनींनी स्वतः बनवलेल्या मूर्तीची गणेश चतुर्थीच्या दिवशी घरी प्रतिष्ठापना करणार आहेत. कार्यशाळेचे प्रशिक्षक म्हणून प्रीती पाटील यांनी दोन दिवसात विद्यार्थिनींकडून आकर्षक अशा इको फ्रेंडली गणपती बाप्पा तयार करून घेतले. आकर्षक असे रंगसंगती भरून  बापाच्या मुर्त्या तयार करण्यात आल्या. विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळावा हाही ह्या दोन दिवसीय कार्यशाळेचा उद्देश होता.

कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. गौरी राणे, उपप्राचार्य डॉ.वि.जे.पाटील, डॉ.पी.एन. तायडे तसंच महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडल्यामुळे प्राचार्या डॉ.गौरी राणे यांनी विद्यार्थिनींचे व महाविद्यालयातील प्राध्यापकांचे कौतुक केले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.सविता नंदनवार, प्रा.योगिता सोनवणे, प्रा.प्रियंका आठे, प्रा.डॉ.सचिन कुंभार, व प्रा.योगेश कोळी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content