माऊली नगरातून शिक्षकाच्या कारची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील माऊल नगरातून एका शिक्षकाची कारची चोरी झाल्याचे  उघडकीला आली. याप्रकरणी दुपारी ४ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, मनोज सुरेश भादुपोता (वय-४२) हे आपल्या परिवारासह कोल्हे हिल्स परिसरातील माऊल नगरात वास्तव्याला आहे. शिक्षकाची नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी १५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता त्यांनी त्यांच्या घरासमोर त्यांची मालकीची कार क्रमांक (एमएच १९ एई १७२७) पार्कींगला लावलेली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ही कार चोरून नेली. हा प्रकार शनिवारी १६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मनोज भादूपोता यांनी सर्वत्र कारचा शोध घेतला परंतू कार कुठेही मिळून आली नाही. अखेर दुपारी ४ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल मोरे करीत आहे.

Protected Content