मानव सेवा शाळेत बाल दिनानिमित्त महाराष्ट्रीय सण माहितीपर प्रदर्शन (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 11 14 at 6.16.04 PM 1

जळगाव, प्रतिनिधी | आज बाल दिन मानव सेवा शाळेत अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यात मराठी चैत्र महिन्यापासून ते फाल्गुन महिन्यात येणारे विविध मराठी सणांची माहिती चित्र तसेच प्रत्यक्ष मांडणी करून माहिती देण्यात आली. या उपक्रमाला जि. प. माध्यमिक शिक्षण अधिकारी बी.  जे.  पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

वाढत्या शहरीकरणात मुलांना आपल्या पारंपारिक सणांची माहिती व्हावी यासाठी मानव सेवा शाळेत तीन दिवशीय महाराष्ट्रीय सण व उत्सव प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यात संस्कार व संस्कृतीचा व ध्यास नागरिक घडविण्याचा हे ध्येय घेऊन शाळेत विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

मान्यवरांचे मनोगत
बालवाडीपासून ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना संस्कार, संस्कृती समजली पाहिजे, त्यांनी याची जोपासली जावी यासाठी हा उत्सव साजरा करण्यात येत असल्याची माहिती माध्यमिक विद्यामंदिर मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना दिली. प्राथमिक विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका माया आंबटकर यांनी सांगितले की, व्हॉटसअप व इंटरनेटच्या जगात आपल्या जुन्या चालीरीती लोप पावल्या जात असल्याने प्रदर्शनात सणाचे नाव, सणाची मांडणी, सणाची पूजा तसेच सामन्यपणे कोणता नैवद्य दिला जातो याची माहिती दिली गेली आहे. तरी या प्रदर्शनास परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

उद्घाटनांवेळी उपस्थितीत
प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. मंजुषा क्षीरसागर, डाएट कॉलेज तसेच शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील, संस्थेचे अध्यक्ष डॉ.आर.एस.डाकलिया, उपाध्यक्ष डॉ. कावडीया, सचिव विश्वनाथ जोशी, कोषाध्यक्ष घेवरचंद राकाजी, सदस्य सी.एम.अग्रवाल, देवेंद्र अग्रवाल, सुभाष पाटील, डॉ. विजय सरोदे, माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी, प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबटकर, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग, पालक वर्ग मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

Protected Content