गणेशोत्सवातून सांघिक भावना वाढीस लागावी ; जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 08 27 at 4.02.32 PM

 

जळगाव, प्रतिनिधी | पुढील आठवड्यात साजरा होणारा गणेशोत्सवातून सांघिक भावना वाढीस लागावी, जनतेपर्यंत चांगले संदेश जावेत असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले. या वेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या अडचणी सोडविण्याचेही आश्वासन दिले.

अल्पबचत भवन सभागृहात झालेल्या या बैठकीत व्यासपीठावर मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाळे निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, पोलिस उपअधीक्षक निलाभ रोहम, एमआयडीसी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ, सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, आदी उपस्थित होते. गणेशोत्सवाची पूर्वतयारी बैठकीच्या सुरुवातीला गणेश मंडळांच्या पदाधिकारी यांनी आपली मनोगत व्यक्त केले. या वेळी त्यांनी येणाऱ्या अडचणींची माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे पुढे यांनी महापालिकेने गणेशोत्सव काळात गणेश मंडळाकडून प्रेत्येक दिवसी निर्माल्य संकलन करण्यासाठी घंटा गाडी पाठव्यात अशा सूचना केल्यात. मागील वर्षी ज्या चुका झाल्या आहेत त्या सुधारण्याची यावर्षी संधी असल्याचेही त्यांनी सांगितले. मागील वर्षाप्रमाणेच यावर्षी देखील शिस्तीत मंडळ विसर्जनासाठी जात होते त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात शिस्तीत यावर्षी मंडळ जातील असे निलाभ रोहन यांनी स्पष्ट केले. पूर्ण तयारी असलेल्या मंडळांना विसर्जन मिरवणूक सहभागी करून घेतले जाईल. अन्यथा त्या मंडळांना मिरवणूक सहभागी करून घेतले जाणार नसल्याचेही रोहम यांनी सांगितले. दरवर्षी प्रमाणे महानगर पालिकेने गणेश उत्सवाचे नियोजन केले आहे. गेल्या वर्षात ज्या त्रुटी आढळल्या होत्या त्या दूर करून अधिक चागल्याप्रकारे सेवा देता येईल व उत्सवाचा आनंद वाढवता येईल या दृष्टीने कार्यवाही महापालिका करेल असे आश्वासन मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी यावेळी दिलेत. जळगाव सार्वजनिक गणेश महामंडळाने स्वतःसाठीआचारसंहिता केलेली आहे. यात गुलालाचा वापर होत नाही, फुलांंनी श्री गणेशाचे स्वागत केले जाते. डीजेचा वापर होत नाही,पारंपारिक वाद्यांचा वापर होतो. महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. गणेशोत्सव हा महाराष्ट्रीय संस्कृतीचा हा अविभाज्य घटक आहे. जळगावचा गणेशोत्सव हा महाराष्ट्रात आदर्श गणेशोत्सव ठरेल अशी आशा महामंडळाचे नारळे यांनी व्यक्त व्यक्त केली.

Protected Content