महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे यांना परिट समाजाचा पाठींबा

parit samaj pathimba to rajumama

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहर मतदार संघातील भाजपा-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे यांना आज महाराष्ट्र राज्य परिट (धोबी) सर्वभाषिक बांधवांच्या बैठकीत पाठिंबा दिला आहे.

या बैठकीमध्ये राज्यातील परिट समाजाच्या न्याय, हक्क व अधिकारासाठी भारतीय जनता पक्षाने सातत्याने आग्रही भूमिका घेतली आहे. परिट समाजाचा अनुसूचित जातीत (sc) समावेश करून आरक्षणाचा लाभ मिळण्याबाबत डॉ.दशरथ भांडे समितीचा अहवाल शिफारशीसह राज्यशासनाच्या वतीने केंद्रसरकारकडे पाठवण्यात आला. यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदार राजूमामा भोळे यांनी अथक प्रयत्न केल्यानेच धोबी समाजाच्या मागणीला चालना मिळाली आहे. समाजाच्याच्या सर्वागीण विकासाकरिता केलेल्या प्रयत्नाबद्दल समाज आपला सदैव ऋणी राहील असे परिपत्रक काढून आमदार राजूमामा भोळे यांना संस्थापक अध्यक्ष देवराज सोनटक्के व प्रदेश युवक कार्याध्यक्ष दीपक बाविस्कर यांनी जाहीर पाठींबा दिला.

याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, प्रदेश सचिव शंकरराव निंबाळकर, अमर परदेशी, उत्तर महारष्ट्र कार्याध्यक्ष प्रभाकर खर्चे, उत्तर महारष्ट्र विभागीय अध्यक्ष सुरेश ठाकरे, कार्याक्रमाचे अध्यक्ष वासुदेव सोनवणे, नगरसेविका सुरेखा सोनवणे, नगरसेवक गणेश सोनवणे, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल सोनवणे, जयंत सोनवणे, युवक जिल्हाध्यक्ष सागर सपके, युवक शहराध्यक्ष उमेश सोनवणे, दिनकर सोनवणे, ईश्वर सोनवणे, राजेंद्र सोनवणे, सुभाष शिरसाळे, रमेश सूर्यवंशी, प्रमोद सोनवणे, सुनील शिंदे, रोहित सोनवणे, सुनील खर्चे, पांडुरंग सोनवणे, धनंजय सोनवणे, शशिकांत तेलंगे, योगिता बाविस्कर, युवक जिल्हा उपाध्यक्ष रोहित परदेशी, सोपान रायपुरे, अरुण राऊत, राहुल निंबाळकर, गणेश सपके, संदीप महाले, प्रा. शांताराम भोळे, अनिल बोरसे आदी उपस्थित होते.

Protected Content