लाचप्रकरणातील संशयिताचा अटकपूर्व जामीन फेटाळला

 

जळगाव प्रतिनिधी । २०० रूपयांची लाच मागणाऱ्या पंटरविरूध्द रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयिताचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

वाहन हस्तांतरणासाठी अधिकृत फी भरल्यानंतरही २०० रुपयांची लाच मागणाऱ्या प्रशांत जगन्नाथ भोळे उर्फ पप्पु भोळे (रा. भुसावळ) या पंटरविरुद्ध २८ ऑक्टोबर रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने वाहन प्रतिनिधी गणेश कौतीकराव ढेंगे (वय ५९, रा. अनुराग स्टेट बँक कॉलनी) यांच्याकडे पैश्यांची मागणी केली होती. जितेंद्र सोनार यांची दुचाकी हस्तांतरण प्रकरणात पंटर भोळे याने लाच मागीतली होती. यावेळी ढेंगे यांनी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागात तक्रार केली. दोन वेळा सापळा रचुन देखील भोळे रंगेहात अटक झाला नव्हता. परंतु, लाच मागीतल्याचे रेकॉर्डींग उपलब्ध झाल्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, भोळे याने अटकपुर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!