मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील ओझरखेडा धरणात घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. आमदार चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते जलपूजन करण्यात आले.
याप्रसंगी विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनिल पाटील, पंढरी मुलांडे, कल्पेश चौधरी, सीताराम चौरे, समाधान कार्ले, सोनाप तायडे, गोविंदा धामोडे, राजू खराटे, वनिल कोळी, दिलीप दांडगे, संजू कोळी, सोनू पुजारी, दिगंबर काळे, प्रदीप काळे, विकास काळे, सुधाकर भड, कृष्णा धोबी, श्रीकृष्ण सोनवणे, रवींद्र पाटील, सुनील पाटील, दीपक माळी यांच्यासह परिसरातील शेतकरी आदी उपस्थित होते. यावेळी धरणात पाणी टाकणे संदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा करत मेहनत घेतल्याचे समाधान व्यक्त करत उपस्थित शेतकऱ्यांनी आमदार पाटील यांचा सत्कार केला.