चैतन्य तांड्यात “दिव्यागां’ना ग्रामनिधीतून जार आणि बॉटल्स वाटप

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायतीने वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त ग्रामनिधीतून एकूण पाच टक्के निधी खर्च करून गावातील दिव्यांग बांधवांना आज जार आणि बॉटल्स वाटप केले. तत्पूर्वी नाईकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उत्साहात जयंती साजरी केली.

हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची आज १ जूलै रोजी ११० वी जयंती साजरी करण्यात येत आहे. यातच तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायतीने सदर जयंती अनोख्या पद्धतीने साजरी केली आहे. ग्रामनिधीचा पाच टक्के खर्च करून गावातील तब्बल तेरा दिव्यांग बांधवांना विस्तार अधिकारी बोरसे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. याबाबत ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे.

लाभार्थांची नावे खालीलप्रमाणे

रोहिदास सुपडू राठोड, अशोक मल्हारी चव्हाण, रणजीत रायसिंग राठोड, विशाल मोहन चव्हाण, दयाराम शिवा चव्हाण, पदम फतू तवर, दामू हरसिंग राठोड, जालम पिता राठोड, गोपाल ज्ञानेस्वर राठोड, उषा दिलीप राठोड, गीता साईनाथ राठोड, गणेश माचिंद्र चव्हाण, मुकेश बंडू चव्हाण आदींचा समावेश आहे.

याप्रसंगी सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनंदा राठोड, ग्रामसेवक कैलास जाधव, जुलाल राठोड (निवृत्त लेखा अधिकारी), करगाव विविध कार्यकारी सोसायटी चेरमन दिनकर राठोड, ग्रा.प सदस्य प्रवीण चव्हाण, भावलाल चव्हाण, राजेंद्र चव्हाण, वसंत राठोड, संदीप पवार, मधुकर राठोड, खिमा, पदम तवर, दिलीप राठोड, गणपत जाधव, सुपडू राठोड व लाभार्थीचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content