खात्यात किमान शिलकीची अट स्टेट बँकेने काढली

नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा बँकेच्या ४४ कोटी हून अधिक ग्राहकांना होणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना यापुढे खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवावे लागणार नाही. यापुढे बँक ग्राहकांकडून SMS शुल्क आकारणार नाही. हा नवा नियम बँकेच्या सर्व बचक खाते धारकांना लागू होणार आहे. ग्राहकांनी खात्यात किमान रक्कम ठेवली नाही तर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

बँकेच्या ज्या बचक खातेधारकांकडे इंटरनेट बँकिंग आणि चेक बुकची सुविधा आहे त्यांचे देखील शुल्क माफ करण्यात आल्याचे SBIने म्हटले आहे. बँकेने यासंदर्भात सोशल मीडियावरील अधिकृत अकांउटवर पोस्ट शेअर केली आहे.

जे खातेधारक महिन्याला १ लाखा पेक्षा अधिक इतकी रक्कम किमान शिल्लक रक्कम ठेवतात त्यांना एटीएमद्वारे केलेल्या व्यवहारांना शुल्क द्यावे लागणार नाही. अशा खातेधारकांना अमर्यादीत एटीएम व्यवहार करता येईल.

या वर्षी मार्च महिन्यात बँकेने सर्व बचत खात्यांवरील किमान शिल्लक रक्कमेचा नियम हटवला होता. आता या सर्व खातेधारकांना झिरो बॅलेन्सची सुविधा मिळणार आहे. बँकेने मेट्रो शहरातील खातेधारकांना किमान शिल्लक रक्कमेची मर्यादा ३ हजार रुपये, छोट्या शहरासाठी २ हजार रुपये तर ग्रामीण भागासाठी १ हजार रुपये इतकी ठेवली होती. आता ती हटवण्यात आली आहे

Protected Content