राज्यात एसटी सुरु होणार; नियम व अटींचे पालन करणे बंधनकारक

मुंबई वृत्तसंस्था । एका जिल्हयातून दुसऱ्या जिल्हयात जाण्यासाठी एसटीची बस सेवा सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. बसमधून प्रवाशांना ई पास तसेच कोणत्याही प्रकारची परवानगी राहणार नाही. मात्र, कोरोना अनुषंगानं प्रशासनानं घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करणे प्रवाशांवर बंधनकारक असणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात परप्रांतीय कामगार व मजुरांना राज्याच्या सीमेवर सोडण्यासाठी व काही अत्यावश्यक सेवा वगळता एसटी पूर्णपणे बंद होती. आता राज्य सरकारनं धाडसी निर्णय घेत एसटीची आंतरजिल्हा सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वीही सरकारनं एसटीची आंतरजिल्हा बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, लोकांच्या मनात असलेल्या भीतीमुळं त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. शिवाय, काही जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्यानं तुलनेने कमी प्रभावित जिल्ह्यांतून सरकारच्या या निर्णयाला विरोध झाला होता. त्यामुळं तो निर्णय स्थगित करावा लागला होता.

Protected Content