जळगाव येथील बालकल्याण समिती तात्काळ बरखास्त करा; मनविसेचे निवेदन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  एरंडोल तालुक्यातील खडके बुद्रुक येथील बालगृहातील ५ अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात जळगाव येथील बालकल्याण समितीवर देखील ताशेरे ओढले जात आहे. ही बालकल्याण समिती तात्काळ बरखास्त करावी अशी मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

गेल्या काही महिन्यांन पूर्वी एरंडोल तालुक्यातील खडके बुद्रुक येथील कै.य.ब पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बालगृहातील झालेल्या अत्याचार प्रकरणी बालगृहातील अल्पवयीन पाच मुलींवर तेथील कर्मचाऱ्यांनी अत्याचार केला. हा प्रकार पीडित मुलींनी जळगाव बालकल्याण समिती कडे तक्रार करूनही त्याची दखल न घेता दिरंगाई केल्या प्रकरणी समिती बरखास्त करून नवीन समिती नेमण्याची मागणी ही समाजातून गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे.

ह्या घटनेवर समाज माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर ताशेरे ओढले गेले अनेक पक्ष संघटना ह्यांनी वेळोवेळी आंदोलन केली निवेदन दिली, तरीही ह्या संतापजनक घटनेवर अजून सुद्धा त्यावर कार्यवाही झालेली नाही. एकीकडे त्यांच्या वर गुन्हे देखील दाखल झाले असून ह्या परिस्थितीमध्ये देखील बालकल्याण समिती अजून ही बरखास्त झालेली नाही. हा प्रकार न्यायव्यवस्थेवरील व प्रशासनावरील समाजाचा विश्वास कमी करणारा आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. पुढील ५ दिवसात जर समिती बारखास्थीचे आदेश झाले नाही तर मनविसे अध्यक्ष  अमित ठाकरे यांचा आदेशाने व जिल्हाध्यक्ष योगेश पाटील यांचा मार्गदर्शनात शहराध्यक्ष कुणाल पवार यांचा नेतृत्वात मोठ्या प्रमाणावर रस्ता रोको करत मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Protected Content