भरडधान्य खरेदीसाठी जिल्ह्यात 19 केंद्र मंजूर ; 1नोव्हेंबर पासून खरेदी सुरू होणार

2 11 48 51 bharad dhanya 1 H@@IGHT 532 W@@IDTH 800

 

जळगाव (प्रतिनिधी) सन 2019-20 या खरीप हंगामातील ज्वारी, मका, बाजारी हे भरडधान्य आधारभुत किंमत योजनेतंर्गत खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जळगाव जिल्ह्यात एकुण 19 भरडधान्य खरेदी केंद्र मंजुर केले असुन चालु हंगामात हे भरडधान्य शासनामार्फत 1नोव्हेंबर पासून खरेदी करण्यात येणार आहे.

 

ज्वारी, मका, बाजरी या भरडधान्याची खरेदी किंमत ज्वारी (संकरीत) 2550/- प्रति क्विटल, ज्वारी (मालदंडी) प्रति क्विंटल 2570/- मात्र, मका 1760/- मात्र प्रति क्विंटल, बाजरी 2000/- प्रति क्विंटल निश्चित केलेली आहे. सर्व साधारण गुणवत्ता दर्जाचेच (एफ.ए.क्यु.) वरील धान्य खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात येईल. भरडधान्य ( ज्वारी, बाजरी, मका) 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर, 2019 याप्रमाणे तालुकास्तरावर केंद्रनिहाय खरेदी करण्यात येणार आहे.

 

 

जळगाव- जळगाव जिल्हा कृषी औदयो. सर्व सेवा सह संस्था लि., अमळनेर-अमळनेर तालुका शेतकी सह संघ लि. पारोळा – पारोळा तालुका शेत. सह. संघ लि., चोपडा- चोपडा तालुका शेत. सह. संघ, लि., धरणगाव- एंरडोल तालुका शेत. सह. संघ. लि., एरंडोल- एरंडोल तालुका शेत. सह. संघ. लि., यावल- कोरपावली वि. का. सेवा. सह. सोसा. लि., रावेर- रावेर तालुका शेत, सह. लि., मुक्ताईनगर- मुक्ताईनगर तालुका शेत. सहा. संघ. लि., बोदवड- बोदवड को. ऑप. सेल परचेस युनि. लि., भुसावळ- भुसावळ तालुका शेत. सह. संघ.‍लि., जामनेर- जामनेर तालुका शेत. सह. संघ. लि., पाचोरा- शेतकरी सह. संघ. लि.पाचोरा, भडगाव- शेतकरी सह. संघ. लि. भडगाव, चाळीसगाव- शेतकरी सह. संघ. लि. चाळीसगाव. आदिवासी विकास महामंडळ मर्या. प्रादेशिक कार्यालय, नंदुरबारचे हंगाम 2017-18 साठी खरेदी केद्रांचे जळगाव जिल्हा केंद्रनिहाय :- यावल- हरीपुरा (संस्थेचे) मार्फत, रावेर- पाल (महामंडळाचे खरेदी केंद्र), चोपडा कर्जोणा (संस्थेचे), चोपडा- सत्रासेन (संस्थेचे).

 

जळगाव जिल्ह्यात 15 तालुक्यातील एकुण 19 खरेदी केद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. शासनाकडुन वेळोवेळी आलेल्या निर्देशानुसार खरेदी केली जाईल. अधिक तपशिलासाठी संबंधित खरेदी केंद्राशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

Protected Content