चोरट्याने काढून दिले चोरी केलेले लॅपटॉप आणि मोबाईल

chorta

जळगाव प्रतिनिधी । शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरी करणाऱ्या आरोपीकडून दोन लॅपटॉप आणि चार मोबाईल हस्तगत केले आहे. त्याने विविध जिल्ह्यात चोरी केल्याची कबुलीही दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, गेल्या महिन्यात एका पाण्याच्या जारच्या दुकानातून तीन हजार रूपये आणि टॅपची अज्ञात चोरट्याने चोरी केली होती. ही चोरी करतांना तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. एमआयडीसी पोलीसात याबाबत गुन्हा दाखलही करण्यात आला होता. एमआयडीसी पोलीसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत त्याला पहूर येथून अटक केली होती. अक्षय प्रकाश छाडेकर वय 21 रा. पहूर पाळधी असे आरोपीचे नाव आहे. तेव्हापासून तो एमआयडीसी पोलीसांच्या पोलीस कोठडीत होता. दरम्यान पोलीसांनी केलेल्य चौकशीतून त्याने जळगाव, भुसावळे, बऱ्हाणपूर, खंडवा या शहरात चोरी केल्याची कबुल केले. त्याने त्यांच्या ताब्यातील चोरी केलेले दोन लॅपटॉप आणि चार मोबाईल पोलीसांना काढून दिले.

Add Comment

Protected Content