रावेर शहरात वाहतुकीस अडथळा ; विक्रेत्यांवर कारवाई

Crime 21

रावेर, प्रतिनिधी | शहरातील डॉ. आंबेडकर चौक ते नवीन सावदा रोड लगत असलेल्या वाहतूकीस अडथळा निर्माण करण्याऱ्या ९ विक्रेत्यांवर आज पोलिसांनी कारवाई केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दंड ठोठवण्यात आला.

रावेर रोडवरील चहा टपरीवाले, फ्रुटगाडीवाले चिकन विकणारे, पान टपरी, नारळ पाणी विकणारे, पाणीपुरी विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई केली. या विक्रेत्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. यात शे. आरिफ शेख गौस मोहम्मद (नागझरी) , सै. तैययब सै. सज्जड, (इमामवाडा), शे. शब्बीर शे मुसा (पाणीटाकी टॉवर), शे. वसीम शे. बाबू (मोमीनवाडा), शे. तन्वीर शे. शकील रा. उटखेडा रोड) , शे.शोएब शे. लुकमान (रा. उटखेडा रोड), उत्तम गोपाळ भोई (रा. भोईवाडा) , समाधान बळीराम महाजन (रा. शिवाजी चौक), ईश्वर शिवलाल भोई (रा. भोईवाडा) यांचा समावेश आहे. या सर्व विक्रेत्यांवर मुंबई पोलीस कायदा १०२/११७ प्रमाणे कारवाई करून JMFC कोर्ट श्री राठोड यांचे समक्ष हजर केले असता प्रत्येकी ३००/- रुपये दंड केला आहे. वाहतुकीस अडथडा निर्माण होईल असे आढळून आल्यास परत कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ही कामगिरी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली एपीआय शितलकुमार नाईक, पीएसआय सुनील कदम, हे. कॉ. धांडे, पो. ना. दिवाकर जोशी यांनी केली.

Protected Content