एस.एन.डी.टी महिला महाविदयालयात १० जानेवारी रोजी रोजगार मेळावा आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी विविध आस्थापनावरील ५२३ रिक्त पदांवर काम करण्याची संधी चालून आली आहे. कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र वअरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळाचे महिला महाविद्यालयाच्या  संयुक्त विद्यमाने विभागाच्या वतीने १० जानेवारी रोजी खाँजामीया रस्त्यावरील एस.एन.डी.टी महिला महाविदयालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात तरूणांनी सहभागी व्हावे. असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता विभागाचे सहायक आयुक्त ‍वि.रा.रिसे यांनी केले आहे.

नोकरी इच्छुक उमेदवारासाठी ही सुवर्णसंधी आहे. इयत्ता १० वी , १२ वी, पदवीधारक, डिप्लोमा मॅकनीकल, एम.बी.ए, बी. ई. मॅकेनिकल ट्रेड अर्हता असलेले तरूण या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी www.mahaswayam.gov.in   संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना ॲप्लाय करणे आवश्यक आहे. सेवायोजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजर आयडी व पासवर्ड ने लॉग-इन करून अॅप्लाय करावा. उमेदवारांनी नांव नोंदणी केलेली नाही त्यांनी देखील सर्व शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रांसह मेळाव्यात मुलाखतीसाठी हजर रहावे. तसेच विभागाच्या www.mahaswayam.gov.in/www.ncs.gov.in या संकेतस्थळावर नांव नोंदणी देखिल करुन घ्यावी.

याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ९.४५ ते संध्या ६.१५ या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२५७ – २९५९७९० वर संपर्क साधावा. असे आवाहन  ही श्री.रिसे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

Protected Content