साकळी येथे हजरत सजनशाह वली बाबांच्या उर्स निमित्ताने कव्वालीचा आयोजन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालूक्यातील साकळी येथील हजरत सजनशाह वली (रहे.) यांच्या ऎतिहासिक उर्स सोहळ्यास आज दि. ७ रोजी पासून सुरुवात होत आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या या उर्स सोहळ्यास शेकडो वर्षाची परंपरा आहे. या दिवशी बाबांच्या संदल निमित्त वाजत–गाजत भव्य मिरवणूक काढली जाणार आहे.

संदल निमित्त जिल्ह्यातून नव्हे तर जिल्ह्याबाहेरुन तसेच महाराष्ट्राबाहेरुन हजारो भाविक भक्त बाबांच्या दर्ग्याच्या दर्शनासाठी येतात. हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक उर्स गावाचा सांस्कृतिक व धार्मिक वारसा असून एकतेचे प्रतिक आहे. प्राचीन काळी डांभूर्णी ता.यावल येथील राजपूत परिवारातील महिला राजवंतीबाईस हजरत सजनशाह वली (रहे.) बाबांनी बहीण मानून राखी बांधून घेतली व राखीची भेट म्हणून जमिनी दिल्या. तेव्हा पासून वंश परंपरेने या महिलेच्या परिवारातुन आजही एकादशीला संदल निमित्त सर्वप्रथम बाबांच्या पवित्र मझ़ार वर चादर चढविली जाते.

ऐतिहासिक दर्गा  हजरत सजनशाह वली(रहे.) यांचे नाव शाह अ.लतीफ (रहे.) असे आहे. ख्वाजा अजमेरी यांच्या सहकाऱ्यांमध्ये त्यांची गणना होते. बाबा शेकडो वर्षापूवीं साकळी येथे आले. त्यांचा दर्गा ऐतिहासिक आहे. दर्गा चारही बाजूंनी पाहिल्यावर सारखाच दिसतो. दर्गा अतिशय कलाकूसरतेने बांधलेला असून लाकडाचा दरवाजा आहे. आम लंगरचा कार्यक्रम- संदल निमित्त दि. ७ रोजी रविवार रोजी अरमान बाबा (मुजावर ) व त्यांचे सहकारी व गावकऱ्यांच्या मदतीने दर्गा परिसरात लंगरे आम( महाप्रसाद) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यात पंचक्रोशित सर्वधर्मीय हजारो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतला, त्याचप्रमाणे साकळी ग्रामपंचायतचे नव लोकनियुक्त संरपच दिपक नागो पाटील, सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक युनुस मन्सुरी, माजी ग्राम पंचायत सदस्य जहांगीर खान कुरेशी, माजी ग्राम पंचायत सदस्य सय्यद अशफाक शौकात, ग्रामपंचायत सदस्य खतीब तडवी, राष्ट्रवादीचे पदाधिकारी शेठ ताहेर कुरेशी अकबर मेंबर अक्सा फाऊंडेशन साकळीयांनी व गावकऱ्यांच्या मदतीने सोमवारी रात्री दर्गा समोर कव्वाली चा कार्यक्रम आयोजीत केला आहे. त्यात भारताचे सुप्रसिद्ध कव्वाल अजीम नाजा (दिल्ली) व छोटी शबनम ( कोल्हापुर) यांची जुगलबंदी पहावयास मिळणार आहे. सुरुवातीला कव्वाल हे ईश्वरभक्ती व नआत म्हणून भाविकांना मंत्र-मुग्ध करणार आहे.या दर्गापरिसरात उर्स निमित्ताने प्रत्येक रविवारी पाच बाजार भरविले जातात.या उर्स दरम्यान सर्वत्र उत्साहाचे व धार्मिक वातावरण असते.

Protected Content