ओबीसी आरक्षण : मोदी सरकारवर ठपका ठेवत यावलला काँग्रेसचेही आंदोलन

 

यावल : प्रतिनिधी ।देशातील ओबीसी आरक्षण रद्द होण्यामागे पंतप्रधान नरेन्द्र मोदी व राज्यातील तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हेच जबाबदार  आहेत असा ठपका ठेवत आज  येथे तालुका काँग्रेस  कमिटीच्यावतीने आंदोलन करण्यात आले

 

सर्वाच्च न्यायालयाने केन्दातील भाजपाच्या शासनाकडुन ओबीसी समाजाची आकडेवारी मागितली होती ती आकडेवारीची माहीती देण्यास केन्द्र शासन अपयशी ठरल्याने देशातील ओबीसी समाजाचे आरक्षण सर्वाच्च न्यायालयाने रद्द केले  म्हणून

ओवीसी आरक्षण रद्द करण्यास महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणी केन्द्रातील नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार जबाबदार आहेत असे या आंदोलकांचे म्हणणे होते

 

आज यावल येथील बुरूज चौकात  राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंती निमित्ताने काँग्रेस तालुका कमिटीच्या  वतीने सामाजीक न्याय दिनाचे औचित्य साधुन ओबीसी समाजाचे हक्क मिळावे म्हणून सकाळी केन्द्रातील भाजपा सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले .

 

आमदार शिरीष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली  कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष संदीप पाटील व तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष कदीर खान, तालुका उपाध्यक्ष अनिल जंजाळे , हाजी गफ्फार शाह , नगरसेवक मनोहर सोनवणे , पुंडलीक बारी , युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ईम्रान पहेलवान, नदीम शेख मोमीन , अविनाश बारी , अजय बढे , राजु बारी , नावरेचे माजी सरपंच समाधान पाटील , कॉंग्रेस आदीवासी आघाडीचे बशीर तडवी , कलीम खान , विक्की गजरे , उस्मान खान यांनी या आंदोलनात सहभाग घेतला .

 

Protected Content