यावल येथे राष्ट्रीय मुल निवासी बहुजन कर्मचारी संघातर्फे धरणे आंदोलन (व्हिडिओ)

यावल प्रतिनिधी । येथील तहसील कार्यालयासमोर राष्ट्रीय मुल निवासी बहुजन कर्मचारी संघातर्फे ‘आरक्षण बचाओ, लोकतंत्र बचाओ’ या मागणीसाठी एक दिवसी धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनास राज्यातील ११ संघटनांनी आपला पाठींबा दर्शविला आहे. दरम्यान आंदोलन करणाऱ्या संघटनेसह आदी संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार आर.डी. पाटील यांनी दिलेल्या निवेदना म्हटले आहे की, राज्यातील अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, भटके विमुक्त आणी विशेष मागास प्रवर्गातील कर्मचारी सरकारी निम सरकारी व शासकीय आणी सार्वजनिक सेवेतील कर्मचारी व अधिकारी यांचे पदोन्नतीतील आरक्षण रोखण्याच्या धोरणाच्या विरोधात दि.१८ फेब्रवारी २०२१ ते २० एप्रिल २१ आणी ७ मे २०२१ च्या शासन निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आणी नोकरीतील आरक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात, सार्वजनिक उपक्रमातील अस्थापनामध्ये नियमाप्रमाणे बिंदुनामावली अदययावत न करता व अनुशेष भरती न करता होणाऱ्या नियमबाह्य भरती प्रक्रीयेच्या विरोधात व ओबीसी प्रवर्गास पदोन्नतीतील आरक्षण लागु न करण्याच्या धोरणाच्या विरोधात, महाराष्ट्र अन्यायकारक शेतकरी विरोधी केन्द्रीय कायदे लागु करण्याच्या धोरणाच्या विरोधात, त्याचप्रमाणे कामगारांचे संवैधानिक अधिकारी नष्ठ करण्यासाठीच्या कामगार हिताचे कायदे रद्द करून निर्माण केलेल्या काळ्या कामगार कायद्याच्या विरोधात तसेच मराठा आरक्षण लागु करणे, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांना शासकीय कर्मचारी न मानता त्यांना नियमित वेतनश्रेणी न घेण्याच्या विरोधात अशा एकुण १४ निर्णयांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. 

या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे आनंद जाधव व मनोज तायडे यांनी केले तर या आंदोलनास प्रोटान संघटनेचे बी. डी. सुरवाडे, महेन्द्र तायडे, प्रभा तायडे, भारत मुक्ती मोर्चाचे पंकज तायडे, पंकज डांबरे, बबलु गजरे, स्वप्नील पारधे, मंथन महीरे, भिमआर्मीचे निलेश सपकाळे, आकास सुरवाडे, अतुल पारधे, आकाश बिऱ्हाडे यांच्यासह चेतन गजरे, भुषण बागुल, ऑल इंडीया दलीत पँथर सेनेचे भुषण साळुंखे, योगेश भालेराव, अमोल भालेराव, राष्ट्रीय किसान मोर्चाचे कुंदन तायडे, भिमराव साळवे, अमर कोळी, भारतीय युवा बेरोजगार मोर्चाचे ज्ञानदेव भालेराव, सागर बहारे, बुद्धीष्ट इन्टरनॅशनल नेटवर्कचे संतोष तायडे, वैभव सोनवणे, चेतन भालेराव, रोहन निकम, हर्षल गजरे, पंकज डांबरे, पंकज तायडे, बबलु गजरे आदींनी या आंदोलनात आपला सहभाग नोंदवला.

 

https://www.facebook.com/508992935887325/posts/4009804339139483/

Protected Content