मुक्ताईनगर येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त परिवर्तन चौकात अभिवादन

मुक्ताईनगर प्रतिनिधी । शिवसेना प्रमुख हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त मुक्ताईनगर शहरातील परिवर्तन चौकात स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

अभिवादन कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे जेष्ठनेते अनंतराव देशमुख, संत मुक्ताई संस्थान पालखी सोहळा प्रमुख हभप रवींद्र हरणे महाराज, शिवसेना उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, माजी तालुका प्रमुख प्रमोद देशमुख, शहर प्रमुख प्रशांत टोंगे, शहर संघटक वसंत भलभले, विभाग प्रमुख महेंद्र मोंढाळे ,जिल्हा नियोजन समिती सदस्य ॲड. मनोहर खैरनार, युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, उप जिल्हा प्रमुख पवन सोनवणे,  अल्पसंख्यांक सेनेचे अफसर खान, आरिफ आझाद, युनूस खान, शकुर जमदार , गोपाळ सोनवणे, सलीम खान, गटनेता राजेंद्र हिवराळे, नगरसेवक संतोष कोळी, पियुष मोरे, निलेश शिरसाट, जाफर अली,  दिलीप पाटील, संतोष माळी, सुरेश भोई, गोलू मुर्हे, दीपक खुळे, पप्पू मराठे, सागर कोळी , शुभम शर्मा  आदींची उपस्थिती होती.

 

शिवसेना महिला आघाडीतर्फे अभिवादन

प्रवर्तन चौक येथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त शिवसेना महिला आघाडी यांनी प्रतिमा पुजन करून केली. यावेळी शिवसेना महीला आघाडी जिल्हा संघटिका कल्पना पालवे, तालुका संघटिका शोभा कोळी, शहर संघटीका सरिता कोळी, शारदा भोई, सुलोचना पाटील, सुनीता तळेले, शोभा मोरे, उज्वला कुंभार, मंगला धनगर, संगीता मराठे, भावना गायकवाड, नगरसेविका सविता भलभले, उषा पाटील, अलका मराठे, अबीदा पिंजारी, दुर्गा मराठे, अनिता मराठे, अलका कोळी, असंख्य महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

 

Protected Content