Home क्राईम मुंबईच्या विवाहितेचा आठ लाखांसाठी छळ; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल

मुंबईच्या विवाहितेचा आठ लाखांसाठी छळ; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल

0
37

जळगाव प्रतिनिधी । मुंबईतील विवाहितेला माहेरुन फ्लॅट घेण्यासाठी ८ लाख रुपये आणावेत या कारणावरुन छळ करणार्‍या पतीसह दोन जणांविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, सुनयना सुधीर खरे वय २९ यांचा सुधीर भास्कर खरे सानपाडा, नवी मुंबई ता. ठाणे यांच्यासोबत विवाह झाला आहे. १६ नोव्हेंबर २०१९ ते सप्टेंबर २०२० यादरम्यान वेळोवेळी सुधीर खरे यांनी सुनयना यांना माहेरुन ८ लाख रुपये फ्लॅट घेण्यासाठी आणावेत अशी मागणी केली. सुनयना यांनी पैसे आणले नाही, त्याचे वाईट वाटल्याने सुधीर खरे यांनी सुनयना यांना दारुच्या नशेत चापटा बुक्क्यांनी मारहाण करत धमकी दिली. तर सुधीर यांचा मामेभाऊ कुलदीप देवराम बाविस्कर रा. पाचोरा जळगाव यानेही सुनयनाबद्दल तिचे पती सुधीर याच्याजवळ चुगल्या लावून शारिरीक व मानसिक त्रास दिला. अशा आशयाच्या सुनयना यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रविवारी सुधीर खरे व कुलदीप बाविस्कर या दोन जणांविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे हे करीत आहेत.

 


Protected Content

Play sound