धनंजय बोरसे यांची कोटक महिंद्रा उपाध्यक्षपदी नियुक्ती

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | धनंजय बोरसे यांची नुकतीच कोटक महिंद्रा कंपनीच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाली.

तालुक्यातील पातोंडा येथील मूळ रहिवासी असलेले मुंबई येथे सेवानिवृत्त झालेले पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोरसे यांचे ते सुपुत्र आहेत.

धनंजय यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सीबीडी बेलापूर येथील भारती विद्यापीठाच्या मराठी माध्यमाच्या शाळेत झाले असून तद्नंतर भारती विद्यापीठाच्या मराठी माध्यमाच्या शाळेत झाले असून दहावीनंतरचे ऐरोली श्रीराम पॉलिटेक्निक व दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीत पदविका व पदवीचे शिक्षण पूर्ण केले. नंतर उच्चशिक्षण पुणे येथील सिम्बॉसीस मधून एमबीएची पदवी संपादित केली.

पुढे विविध उत्पादनाच्या नामांकित कंपन्यांच्या आस्थापनामध्ये नोकरी करत राहिले. त्यांच्या कठोर,विविध कौशल्ये,हुशारी आणि अथक परिश्रमाने प्रगतीचा आलेख बघून त्यांची कोटक महिंद्रा कंपनीने त्यांच्या कंपनीच्या ग्रुपमध्ये उपाध्यक्ष म्हणून धनंजय यांची उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांचे सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात योगदान असून प.पू.श्री.श्री. रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग मध्येही योग शिक्षकाचे धडेही त्यांनी गिरवले आहेत.

पातोंडा येथील युवक एवढ्या मोठ्या पदावर पोहचत असल्याने पातोंडा ग्रामस्थांनी मान उंचावली आहे.त्यांच्या ह्या नियुक्तीचे पातोंडयाचे नाव उंच भरारीवर गेले असून खान्देश वासियासाठी ही अभिमानाची बाब आहे. काही दिवसांपूर्वी पातोंडा येथील कपिल पवार यांची जळगाव महानगर पालिकेतून नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी पदी पदोन्नती झाली असून सोबतच त्यांच्या पत्नी स्नेहा पवार यांचीही धरणगाव पंचायत समितीमधून गटविकास अधिकारी पदावरून जळगाव जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी पदोन्नती झाली.

एकामागून एक पातोंडयाचे सुपुत्रांची कामगिरी बघून पातोंडा ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

Protected Content