काहीही नाही, फक्त त्याकडे दुर्लक्ष करा! खा. संजय राऊत

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यात मविआतील सर्वच वरिष्ठ नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर समाधानी आहेत, आणि जर कोणी प्रश्न निर्माण केला तर, काहीही नाही फक्त त्याकडे दुर्लक्ष करा, अशी प्रतिक्रिया खा. संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर दिली.

राज्यात कॉमन मिनिमम प्रोग्रामनुसार अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन शिवसेनचे उद्धव ठाकरें मुख्यमंत्री आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. यात तुळजापूरच्या देवीचे दर्शन घेत पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा झाल्यास नवस फेडण्यासाठी येईन असे म्हटले.

यावर, महाराष्ट्राच्या राजकारणात असे अधून मधून काही लोक जनतेत संभ्रम निर्माण करत असतात. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असून आघाडीचे नेतृत्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. ज्येष्ठ जाणते राजे तथा राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे, कॉंग्रेसच्या सोनिया गांधी, राहुल गांधी हेच नव्हेतर सर्वच नेते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर आनंदी आणि समाधानी आहेत. त्याच्यामुळे अशा वक्तव्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे असे संजय राऊत म्हणाले आहेत.

यासोबतच राज्यसभा निवडणुकीवरुन संजय राऊत यांनी भाजपने दोन्ही उमेदवार हे बाहेरचे असून, त्यांनी कोणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा प्रश्न आहे, पण भाजपा जुना पक्ष राहिलेला नसून जे इतर पक्षातून आले आहेत अशाच लोकांनी एकत्र येऊन पक्ष ताब्यात घेतला आहे. आणि शिवसेना, महाविकास आघाडीवर चिखलफेक करत असतात त्यांना उमेदवारी दिली आहे. पण शिवसेनेने निष्ठावंतांना उमेदवारी देण्यात आली आहे, असे म्हणत भाजपावर निशाणा साधला. त्यांच्याकडे आवश्यक तेवढी मते नाहीत, असती तर त्यांनी संभाजीराजेंना उमेदवारी दिली असती. भाजपाने आधी संभाजीराजेंना पाठिंबा देत सहाव्या जागेसाठी उमेद्वारी देण्याचा करण्याचा प्रयत्न केला. नंतर कोल्हापुरातूनच दूध आणि साखर सम्राटाला उमेदवारी दिली, यावरून त्यांना राज्यात घोडेबाजार करायचा असे स्पष्टच दिसत आहे.

Protected Content