धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालयाचा ९७.९८ टक्के निकाल; विज्ञान विभागाचा १०० टक्के यश

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तापी परिसर विद्यामंडळ संचलित धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालय, फैजपूर येथे इ. १२ वी चा निकाल ९७.९८ टक्के लागून, महाविद्यालयाने यंदाही उत्तुंग यशाची परंपरा कायम राखली आहे. यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागल्याचे विशेष उल्लेखनीय आहे.

विज्ञान शाखेत :
प्रथम क्रमांक: वायकाळे दिया रविंद्र – ८२.५० टक्के
द्वितीय क्रमांक: नारखेडे भाग्यश्री उमेश – ८२ टक्के
तृतीय क्रमांक: चौधरी गायत्री शशिकांत – ८१.८३ टक्के

वाणिज्य शाखेचा निकाल ९८.०३ टक्के लागला असून,
प्रथम क्रमांक: संयोगिता गिरीशसिंग राजपूत
द्वितीय क्रमांक: पार्थ किशोर चिमणकर – ८५.५० टक्के
तृतीय क्रमांक: प्रगती प्रमोद कुरकुरे – ८३.६७ टक्के

कला शाखेचा निकाल ७५ टक्के लागला असून,
प्रथम क्रमांक: उज्वला अशोक सपकाळे – ६७.५० टक्के
द्वितीय क्रमांक: तरबेज संजीव तडवी – ६४.८३ टक्के
तृतीय क्रमांक: रोहित दिलीप बोदडे – ५९ टक्के

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शिरीष चौधरी, उपाध्यक्ष श्री. एस.के. चौधरी, मिलिंद शंकरराव वाघुळदे, चेअरमन लिलाधर विश्वनाथ चौधरी व सचिव एम. टी. फिरके यांच्यासह सर्व संचालक मंडळाने विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. उत्पल एल. चौधरी तसेच सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या यशस्वी भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Protected Content