धनाजी नाना महाविद्यालयाच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम

शेअर करा !

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथील धनाजी नाना महाविद्यालयाने आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली असून एकूण ९७.४१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

store advt

यंदाच्या एच.एस.सी परीक्षेत धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालयातून एकुण२३२विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते. त्यापैकी२२६विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाचा एकुण निकाल ९७.४१ % लागलेला आहे.विज्ञान शाखेचा निकाल ९८.७० %०असून यात प्रथम सृष्टी राजेश कोल्हे ८७.०७ टक्के, द्वितीय लिना तुषार सुपे ८४ टक्के, तृतीय ईशा राजेश तंटक ८२.३० टक्के या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल ९८.२४ टक्के असून प्रथम आकृती युवराज लोधी ७९.२३ टक्के, द्वितीय नेहा कैलास महाजन ७८.७६ टक्के , तृतीय पल्लवी सुधाकर तायडे ७६.१५ टक्केया क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. तसेच कला शाखेचा निकाल ८५.७१ % असून प्रथम आर्यन नंदकिशोर पाटील ८५.५३ टक्के, द्वितीय रोशनी राजेन्द्र सपकाळे ६४.७६ टक्के , तृतीय साहिल फिरोज खाटीक ६२.३० टक्के या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.

सगळ्या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आ. शिरीषदादा चौधरी , उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ,प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, उपप्राचार्य, पर्यवेक्षक प्रा.वंदना बोरोले तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!