पहूर येथे रॅपीड अँटीजेन टेस्टला प्रारंभ; पहिल्याच दिवशी २५ पॉझिटीव्ह

शेअर करा !

पहूर , ता . जामनेर रविंद्र लाठे । येथील आर. टी. लेले हायस्कूलच्या क्वारंटाईन सेंटर मध्ये आज पासून रॅपिड अँटीजन टेस्ट सुरू करण्यात आल्या असून पहिल्याच दिवशी ९२ जणांची चाचणी करण्यात आली असून त्यापैकी २५ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले असल्याची माहिती नोडल ऑफिसर तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ . हर्षल चांदा यांनी दिली आहे.

store advt

पहूर येथे कोरोना विषाणू संसर्गाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच असून पहूर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. पहूर परिसरातील खेड्यापाड्यांतही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रूग्ण वाढत असून हिवरखेडा दिगर येथील ८५ वर्षीय आजींच्या संपर्कातील १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच पहूर पेठ येथील रहीवासी कोरोना योद्ध्या शिक्षकांच्या पत्नीचाही ( ४० वर्षे )अहवाल पॉझिटिव आल्याने पहूर मधील बाधितांची संख्या आता ५ ८ झाली आहे.

दरम्यान, पहूर येथील रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट मधील बाधीतांची संख्या खालील प्रमाणे आहे.

हिवरखेडा- १४
पहरपेठ – १
नेरी – २
वाकोद -१
पाळधी -५
शेंदूर्णी – २

येथील रॅपीड अँटीजेन टेस्ट ही जिल्हाधिकारी अभिजित राऊत ,जिल्हा शल्य चिकित्सक नागोराव चव्हाण ,तहसीलदार अरुण शेवाळे ,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ . राजेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आली आहे. या टेस्ट मध्ये संशयितांचे स्वॅब घेतल्या नंतर अवघ्या अर्ध्या तासात रिपोर्ट येत असल्याने क्वारंटाईनसाठीची प्रतीक्षा संपली आहे. लोक स्वतःहून आपली चाचणी करून घेण्यासाठी पुढे येत आहेत. पहूर परिसरातील खेड्यापाड्या वरही मोठ्या गतिने कोरोनाचे संक्रमण होत असल्याने पहुर केंद्रावरील अँटीजेन टेस्ट किट मोठ्या संख्येने उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी वैद्यकीय अधीक्षक डॉ . हर्षद चांदा यांनी केली आहे .

पहूर आर .टी . लेले हायस्कूल विलगीकरण केंद्रावर आज वैद्यकीय तपासणीसाठी नोडल ऑफिसर डॉ. हर्षल चांदा , डॉ .पुष्कराज नारखेडे, डॉ .संदीप कुमावत, डॉ. जितेंद्र वानखेडे, डॉ. कुणाल बाविस्कर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुनील चौधरी, देवेंद्र घोंगडे, प्रदीप नाईक ,संजय सरपटे यांच्यासह आशा सेविका व वैद्यकिय यंत्रणेचे सहकार्य लाभले.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!