तक्रार देऊन तडजोड; ‘त्या’ प्रकरणाच्या चौकशीची मागणी

यावल प्रतिनिधी । येथील एका तक्रारदाराने सावकाराविरूध्द तक्रार देऊन नंतर संशयास्पद तडजोड केली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आरपीआयचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया ( आठवले गट )चे जळगाव जिल्हाध्यक्ष राजु सुर्यवंशी यांनी पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांच्याकडे दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की, यावल पोलीस स्टेशनमध्ये दिनांक १ जुलै रोजी यावल येथील राहणार मनोज उर्फ सचिन वासुदेव बारी या व्यक्तीने फिर्याद दिली होती. त्यांनी आपल्या तक्रारीत शहरातील एका तथाकथीत सावकारी करणार्‍या व्यक्तिने कर्जवसुलीच्या नांवाखाली पोलीसांचा बळ वापरून स्वताःचा आर्थीक फायदा करून घेण्याकरीता मनोज उर्फ सचिन वासुदेव बारी यांच्याकडील ट्रॅक्टर जमा करून नंतर आर्थिक तडजोड केली आहे.

या सर्व आर्थिक गोंधळाची चौकशी व्हावी. यात यावलचे पोलीस निरिक्षक यांनी सावकाराशी आर्थीक व्यवहार करून घेत आमच्या तक्रार अर्जाची दखल घेतली नाही. यात बारी यांनी म्हटले आहे की, मी वारंवार तक्रार करून देखील माझी तक्रार घेतली नाही. त्यांनी दिलेल्या तक्रार अर्जात अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप नमूद केले असतांना अर्जदाराने अचानक आपले तक्रार अर्ज मागे घेतल्याने शासनाचे व पोलीसांची व कायद्याचे उल्लंघन केले आहे. या तक्रार संदर्भात विभागीय पोलीस अधिकारी यांनी देखील या सावकार व अर्जदार यांने आपले आर्थिक हित साध्य करण्यासाठी पोलीस बळाचा वापर केल्याचे समोर आले आहे. संबंधीताने पोलीसात खोटी फिर्याद दिली म्हणुन पोलीसांनी सदर व्यक्ति विरूद्ध गुन्हा दाखल करावा. असे न झाल्यास दिनांक २० जुलै सोमवार दुपारी १२ वाजे पासुन आम्ही रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट )च्या माध्यमातुन यावल पोलीस स्टेशनला जेलभरो आंदोलन करणार असल्याचा इशारा रिपाइं आठवले गटाचे जिल्ह्यध्यक्ष राजु भागवत सुर्ववंशी; तालुकाध्यक्ष अरूण सुपडू गजरे, भिमराव दत्तु गजरे, शहराध्यक्ष विष्णु टीकाराम पारधे, पप्पु छोटु पटेल, सागर अरूण गजरे, विजय गजरे, नितिन बोरेकर आणी जगदीश यांच्या स्वाक्षरीचे निवेदन पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांना देण्यात आले आहे.

Protected Content