‘ती’ पोस्ट चुकीची ! ; व्हायरल केल्यास होणार कारवाई

जळगाव प्रतिनिधी । जिल्हाधिकारी राऊत यांच्या नावाने संचारबंदीच्या कथित इशार्‍याबाबत सोशल मीडियात व्हायरल झालेली पोस्ट खोटी असून कुणी याला शेअर केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

याबाबत वृत्त असे की, ”सहकार्य न केल्यास जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी लागू करण्याचे जिल्हाधिकारी यांचे संकेत” या शीर्षकाखाली सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेली पोस्ट चुकीची आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
जिल्ह्यात साथरोग प्रतिबंध कायदा लागू असून अशावेळी चुकीची व अफवा पसरविणारी माहिती व्हायरल करून
नागरिकांमध्ये भीती निर्माण करणे चुकीचे आहे. जे कोणी अशी चुकीची माहिती व्हायरल करून अफवा पसरवतील अशा व्यक्ती विरोधात सायबर कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल. असा इशाराही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे.

कोरोनाच्या प्रतिकारासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन हे प्रयत्नशील असून यामुळे बरे होणार्‍या रूग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमिवर, सोशल मीडियात फेक न्यूज प्रसारीत करून नागरिकांमध्ये संभ्रम पसरवणे चुकीचे आहे. कुणीही अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल, लाईक वा शेअर करू नये. कोणत्याही वृत्ताची खातरजमा करूनच याला प्रसारीत करावे असे आवाहन आम्ही लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या माध्यमातून करत आहोत.

Protected Content