Home Cities जळगाव जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस महिला कार्यकर्त्यांचे कार्यालयासमोर अनोखे आंदोलन (व्हिडीओ)

जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस महिला कार्यकर्त्यांचे कार्यालयासमोर अनोखे आंदोलन (व्हिडीओ)

0
37

savita borse

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत मुंबईत टॅक्सी चालकाने गैरवर्तन केल्याच्या निषेधार्थ आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कार्यालयासमोर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांचे अनोख्या पद्धतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुप्रिया सुळे काल देवगिरी एक्स्प्रेसने प्रवास करत होत्या. कुलजीतसिंह मल्होत्रा हा प्रवाशांना भाड्यासाठी हुज्जत घालत होता. त्याने नंतर सुप्रिया सुळेंना गाठले आणि त्यांच्याशी हुज्जत घालू लागला. सुळे यांनी त्याला दोनदा नकार दिला. मात्र, मल्होत्राने सुप्रिया सुळेना पुढे जाऊ न देता अडवून धरले. इतकेच नाही, तर तो थेट मोबाईल काढून त्यांच्यासोबच सेल्फी काढू लागला. त्यानंतर सुळे यांनी ही माहिती ट्विटद्वारे रेल्वे मंत्रालयाकडे तक्रार केली. त्यांनतर भारतीय रेल्वे कायद्यांतर्गत दादर आरपीएफने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यावेळी माजी महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, महिला सरचिटणीस मिनल पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/469493363896688/


Protected Content

Play sound