सहकरातुन विकास साधता येतो : ना.गुलाबराव पाटील

जळगाव (प्रतिनिधी) सहकार हा विकासाचा आत्मा आहे. सहकारात पारदर्शीपणा ठेवून एकमेकांच्या सहकार्याने खऱ्या अर्थाने विकास साधता येतो. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असून प्रत्येक शेतकऱ्याला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना महत्व प्राप्त झाले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने शिव पानंद रस्ते विकासासाठी सहकार्य केल्यास शेतकऱ्यांचे हित जोपासले जाईल असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री तथा शिवसेना उपनेते ना. गुलाबराव पाटील यांनी किनोद येथे कृ.ऊ.बा. च्या विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी केले.

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने किनोद येथे उपबाजार आवारात पेव्हींग ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी कृउबा सभापती लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते तथा जेडीसीसी बँकेचे संचालक संजय पवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण , संचालक सदस्य प्रभाकर पवार वसंत भालेराव, भरत बोरसे, डॉ कमलाकर पाटील , जनाअप्पा कोळी,अनिल भोळे आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळे उपक्रम व विकास कामे सुरू केल्याबद्दल राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सभापती लक्ष्मणराव पाटील व संचालक मंडळाचे कौतुक केले. किनोद- कानळदा, कानळदा ते भोकर, भोकर ते गाढोदा, गाढोदा ते भादली, फुपनगरी ते ममुराबाद, भोकर ते रामेश्वर, आव्हाने फाटा ते आव्हाने या रस्ते विकासाची कामे लवकरच सुरू होणार असल्याचे नामदार पाटील यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे शिवरस्ते विकसित करण्यासाठी मार्केट कमिटी ने पुढाकार घेण्याचेही आवाहनही त्यांनी केले. शेतकऱ्यांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी फिल्टर प्लान्ट किनोद येथे बसवण्याची सूचनाही गुलाबराव पाटील यांनी केली. तर कृऊबा सभापती लक्ष्मण पाटील म्हणाले की, जळगाव येथे एक कोटी रुपये फी जमा करून 29 एकर जागा कृऊबासाठी घेतली जाणार आहे तर नशिराबाद येथे 2 एकर जागेवर लवकरच उपबाजार आवार सुरू केला जाणार असल्याचे सांगून कृ.ऊ. बा. च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध आहे असे सांगितले.

 

ना. पाटील म्हणजे जाती- पातीला थारा न देणारे नेते : संजय पवार

यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा नेते तथा जेडीसीसी बँकेचे संचालक संजय पवार यांनी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विकास कामाचे तोंड भरून कौतुक केले. नामदार गुलाबराव पाटील हे जाती- पातीला थारा न देणारे नेते असल्याचे संजय पवार म्हणाले. केवळ मतदारसंघातच नव्हे तर मंत्रिपदाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास गुलाबराव पाटील यांच्या मार्फत होत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी संचालक प्रभाकर पवार, राजेंद्र चव्हाण यांनीही यावेळी मनोगते व्यक्त केली.

दरम्यान करंज येथे 3 लाख रुपये खर्चून होणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. राज्यमंत्री पाटील यांनी करंज येथील जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट दिली. यावेळी शाळेतील स्वच्छता व कामाविषयी समाधान व्यक्त केले. तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधून शैक्षणिक उन्नती बद्दल शिक्षकांचे कौतुकही केले. जिल्हा परिषद शाळेला संगणक व प्रिंटर संच उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर ताराचंद अन्ना उर्फ वसंत भालेराव ,पंचायत समिती सदस्यपती, जनाप्पा कोळी,फुपनी सरपंच डॉ.कमलाकर पाटील ,शेतकी संघाचे अध्यक्ष उत्तमराव सपकाळे, माजी सभापती भरत बोरसे , शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, शेतकी संघाचे रामचंद्र बापू पाटील, पांडुरंग पाटील , कृ ऊ बा चे संचालक मनोहर पाटील, अनिल भोळे, संतोष नारखेडे , कैलास चौधरी, शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रमोद सोनवणे, विका सोसायटी चेअरमन योगेश लाठी,नवल पाटील ,सरपंच मदन पाटील, पंकज पाटील, जीतू पाटील यांच्यासह प्रगतशील शेतकरी व उद्योजक दत्तू पाटील ,किशोर आगीवाल , मंगलसिंग पाटील ,अशोक गावंडे, चुडामन वाघ, गजानन सोनवणे, राजू चौधरी यांच्यासह किनोद व कानळदा परिसरातील सरपंच, विकास सोसायटीचे पदाधिकारी ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक भगवान सोनार यांनी केले तर आभार शुभम पाटील यांनी मानले.

Add Comment

Protected Content