Home राष्ट्रीय पूर्वा एक्सप्रेसचे डबे रूळांवरून घसरले

पूर्वा एक्सप्रेसचे डबे रूळांवरून घसरले

0
63


कानपूर वृत्तसंस्था । हावडा येथून दिल्लीस जाणार्‍या पूर्वा एक्सप्रेसचे १२ डबे रूळावरून घसरल्यामुळे अनेक प्रवासी जण जखमी झाले असून ही दुर्घटना रात्री एकच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कानपूर शहराजवळ असणार्‍या रूमा गावालगत पूर्वा एक्सप्रेसचे डबे रूळांवरून घसरले. यात १३ प्रवासी जखमी झाले असून यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. रेल्वेचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या गाडीतील प्रवाशांना दुसर्‍या रेल्वेने कानपूर येथे रवाना करण्यात आले आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती मिळालेली नाही. याची रेल्वे प्रशासनातर्फे चौकशी सुरू करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound