संभाजी भिडे गुरूजी यांच्या समर्थनार्थ निदर्शने ; जिल्हा प्रशासनाला निवदेन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । संभाजी भिडे गुरूजी यांच्यावर काही लोक जाणीवपुर्वक बदनामी करत कट कारस्थान करीत आहे. याच्या विरोधात श्रीशिवप्रतिष्ठान हिंन्दूस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येवून जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरूजी यांच्या बाबतीत अपुर्ण माहितीच्या आधारे अत्यंत खालच्या स्तरावर टिका केली जात आहे. गेल्या ६० वर्षांपासून संभाजी भिडे गुरूजी हे पुण्यश्लोक श्री शिवछत्रपतींच्या विचारांवर चालणारे देशभक्त धर्मभक्त व निर्व्यसनी तरूण पिढी घडविण्याचे काम अत्यंत निष्ठेने करीत आहे. गेल्या काही दिवसांपासून हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रा या उपक्रमांतर्गत मार्गदर्शन करण्यासाठी ठिकठिकाणी बैठका घेतल्या जात आहे. त्यातील काही वक्तव्याचा ठराविक काही भाग गाळून समाजकंटक गुरूजींच्या वक्तव्याचा जाणीवपुर्वक विपर्यास करून व सोशल मीडियाचा गैरवापर करून समाजामध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ राजकीय स्वार्थासाठी संभाजी भिडे गुरूजींच्या बाबतीत अत्यंत गलिच्छ पातळीवर जावून कट कारस्थान करून समाजात गुरूजींची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे असे मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.

Protected Content