दुचाकी अपघातातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील निंबा देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या दुचाकीस्वाराचा  अपघातात जखमी झाल्यानंतर  उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना ममुराबाद रोड जवळ काल  दुपारी घडली. तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

मुकेश नारायण पाटील (वय 32 रा. समतानगर) असे मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे. नातलगांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश नारायण पाटील आणि सतीश विजय संदांशिव हे दोघे इतर मित्रांसह यावल तालुक्यातील डांभुर्णी गावाजवळ असलेल्या या निंबा देवीच्या दर्शनासाठी दुचाकीने काल मंगळवार २० जुलै रोजी सकाळी ११  वाजता  गेले होते. निंबा देवीचे दर्शन घेतल्यानंतर सायंकाळी ४  वाजेच्या सुमारास जळगाव येथे घरी परतत असताना ममुराबाद जवळ समोरून येणाऱ्या दुचाकीला कट मारण्याच्या नादात दुचाकी घसरून दुचाकीचालक मुकेश पाटील आणि सतीश संदांशिव हे दोघे जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. यातील गंभीर जखमी झालेल्या मुकेश पाटील यांचा आज सकाळी साडेनऊ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.

 

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!