अमृत योजनेच्या खड्ड्यात चारचाकी वाहन फसले; चालकाच्या सतर्कतेने टळला अपघात

जळगाव प्रतिनिधी । शहरातील कांचननगरात अमृत योजनेचे काम नुकतेच पुर्ण झाले आहे. तरीही भोंगळ कारभारामुळे अमृत योजनेच्या  केलेल्या कामाच्या ठिकाणी आलेल्या खड्ड्यात चारचाकी वाहन अडकले. सदैवाने वाहनचालकाच्या सतर्कतने थोडक्यात अपघात टळला आहे. सुमारे दीड तासानंतर हे वाहन जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. 

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कांचन नगर परिसरातील चारभुजा किराणा दुकानासमोर नुकतेच अमृत योजनेच्या पाईपाचे कामपुर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे ठेकेदाराने काम पुर्ण करून थातूर मातूर पध्दतीने खड्डे बुजविण्यात आले आहे. आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ( एमएच १९ एस ५५९२ ) क्रमांकाचे ४०७ वाहन लग्नसमारंभात स्वायंपाक करण्यासाठी लागणारे वस्तू घेवून जात होते. यात चालक आणि मागेच्या भागात पाच ते सहा महिला मजूर बसलेल्या होत्या. खड्डे बुजविलेल्या रस्त्यावरून वाहत जात असतांना अचानक अमृत योजनेचे काम केलेल्या ठिकाणी खड्डा पडल्याने वाहन फसले. दरम्यान चालकाने तातडीने वाहन जागीच थांबवून मजूरांना उतरवून दिले. अनेक प्रयत्न करूनही वाहन बाहेर निघत नसल्याचे पाहून वाहनचालकाने जेसीबीला मागवून त्याच्या मदतीने दीड तासानंतर खड्ड्यात अडकलेले वाहन बाहेर काढण्यात आले. अमृत योजनेचे काम दिलेल्या ठेकेदाराने केलेल्या कामाबद्दल परीसरातील नागरीकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

Protected Content