खरात टोळीची हद्दपारी कायम : अपील फेटाळले

भुसावळ प्रतिनिधी | येथील नगरसेवक राज खरात यांच्यासह पाच जणांनी हद्दपारीच्या विरूध्द केलेले अपील विभागीय आयुक्तांनी फेटाळून लावल्याने त्यांच्या विरूध्दची हद्दपारी कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या संदर्भात वृत्त असे की, विविध गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांमुळे पाच जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. यात आतिष रवींद्र खरात (वय २५), राज उर्फ सनी रवींद्र खरात (वय २७), हंसराज रवींद्र खरात (वय २९), राजन उर्फ गोलू रवींद्र खरात, (वय २२, सर्व रा.समता नगर, भुसावळ) आणि अमोल उर्फ चिन्ना शाम खिल्लारे, (वय २५, रा.देशमुखवाडी रेल्वे न्यू वॉटर टँक, हनुमान मंदिराजवळ अकोला ह.मु. समता नगर, भुसावळ) या पाच जणांच्या टोळीला ऑगस्ट २०२१ मध्ये जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी या संदर्भातील आदेश पारीत केले होते.

दरम्यान, या कारवाईच्या विरोधात वर नमूद केलेल्या सर्वांनी विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. आयुक्तांनी हे अपील फेटाळून लावल्यामुळे या पाचही जणांची हद्दपारी कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content