खडकदेवळा परिसरातून शेती उपयुक्त साहित्य चोरणारे तीन संशयीतांना अटक

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा ते गोंदेगाव रस्त्यावरील शेतकर्‍याने प्रसंगअवधानातुन शेतातून ठिबक सिंचन च्या नळ्या व पाईप चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना त्यांच्या जवळ असलेल्या अॅपेरिक्षासह पकडुन घटनेतील तिनही संशयितांना पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये हजर केली आहे. शेतात उभे असलेले पिक जसे सुरक्षित नाही तसेच शेतातील शेती उपयुक्त असे साहित्यही सुरक्षित नसल्याचे या घटनेवरून दिसुन येते.

याबाबत प्राप्त माहीती अशी की, खडकदेवळा बु” येथील संतोष सुर्यवंशी यांची शेती ही खडकदेवळा गोंदेगाव या रस्त्यावरिल गट क्रमांक १०८ मध्ये रस्त्याला लागुन आहे. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:३० वाजता संतोष सुर्यवंशी हे गोंदेगाव येथुन शेतातील गव्हाचे पिक पाहण्यासाठी आले असता त्यांना त्यांच्या शेतात तिन अनोळखी व्यक्ती एक अॅपे रिक्षा क्रं. एम. एच. ०२ एक्स. ए. ६९६० घेउन घुसलेले आढळून आले. सदर इसम हे शेतातील ठिबक सिंचनाच्या नळ्या व पाईपांची तोडफोड करून गठ्ठा बांधून ॲपेरिक्षात टाकत होते. संतोष सुर्यवंशी यांनी त्यांना टोकले असता त्यांनी आम्ही लघुशंकेसाठी आलो आहोत असे सांगितले. परंतु शेतकरी संतोष सुर्यवंशी यांना हे चोरी करित आहेत असा संशय आला व संतोष सुर्यवंशी यांनी विचारले की, मग पाईप का तोडून फोडून गाडी टाकत आहात असे विचारले असता त्यांनी घाबरून काहीही न सांगता गप्प राहिले. संतोष सुर्यवंशी यांना हे चोर आहेत, हे शेतातील पाईप, मोटर चोरण्यासाठी आले आहेत. हे लक्षात येताच त्यांनी तात्काळ आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आरोळ्या मारुन तसेच भ्रमणध्वनीद्वारे शेजारील शेतांमध्ये असलेले सोमनाथ मोरे, समाधान पाटील, राजेंद्र पाटील व चंद्रकांत ब्राह्मणे यांना बोलावून घेतले. यावेळी चंद्रकांत ब्राह्मणे यांच्याकडून माहिती मिळाली की, दोन दिवसांपूर्वी त्यांचे सारोळा खु” ता. पाचोरा शेतातील अशोका कंपनीचे स्टार्टर व तेजस कंपनीची ४०० फूट लांबीची केबल अशा सुमारे ६ हजार ५०० रुपये किंमतीच्या वस्तू चोरीला गेलेल्या आहेत. वाहनासह शेतात आलेल्या त्या इसमांचा इरादा हा चोरी करणेच होता. हे लक्षात आल्यानंतर सोबतच्या शेतकऱ्यांच्या मदतीने संतोष सुर्यवंशी यांनी तिघांना वाहनासह खडकदेवळा बस स्टॅन्ड वर आणले व त्यांची सखोल चौकशी केली तेव्हा तिघांनी नशीर बशीर पठाण, पप्पू मोतीराम परदेशी व फिरोज नजीर पिंजारी असे नाव सांगितले. तर ॲपे रिक्षा ही मस्तान अली उस्मान अली यांची असल्याचे त्यांनी सांगितले. सदर तीनही इसमांना ॲपे रिक्षा घेऊन पाचोरा पोलिस स्टेशनला संतोष सुर्यवंशी यांनी आणुन त्यांचे विरूद्ध भाग – ५ गु. र. नं. ४४ / २३ भा.द.वी. ३७९, ५११, ३४ प्रमाणे संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चोरीचा प्रयत्न केलेल्या त्या तिनही संशयिंतांजवळ कोणताही मुद्देमाल सापडुन न आल्याने त्यांना उद्याप अटक करण्यात आले नसले तरी शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांसोबतच औजारे व शेतीसाठी लागणारे साहित्य ही असुरक्षित आहेत. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल सचिन निकम हे करित आहेत.

Protected Content