आसनखेडा येथे बंद घर फोडून ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील आसनखेडा येथे बंद घराचे कुलूप तोडुन घरात अनाधिकृत प्रवेश करत अज्ञात चोरट्याने घरातील कपाटात ठेवलेले २० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व १३ हजार रुपये रोख असा ३३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याने अज्ञात चोरट्याविरुद्ध मंगळवारी ७ फेब्रुवारी रोजी दुपारी पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, आसनखेडा ता. पाचोरा येथील रहिवाशी सुभाष त्रंबक पाटील व त्यांच्या पत्नी विमलबाई सुभाष पाटील हे दि. १ फेब्रुवारी पासुन पुणे येथे मुलाकडे गेले होते. दरम्यान दि. ६ फेब्रुवारी सुभाष पाटील यांच्या भावाचा फोन आला की, तुमच्या घराचे कुलूप तुटलेले आढळुन येत आहे. ही माहिती मिळताच सुभाष पाटील व विमलबाई पाटील यांनी आसनखेडा गाठले. घरात प्रवेश करुन पाहणी केली असता घरातील कपाटात ठेवलेले २० हजार रुपये किंमतीचे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बाजुबंद व १३ हजार रुपये रोख असा एकुण ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला नाही. म्हणुन विमलबाई सुभाष पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आला असुन या चोरीच्या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल मुकुंद परदेशी हे करीत आहे. तसेच सुभाष पाटील यांच्या घराच्या शेजारी राहणारे नाना महादु पाटील हे देखील मुक्ताईनगर येथे गेले असता त्यांचे देखील घराचे कुलूप तुटलेले आढळुन आले आहे. मात्र त्यांचे घरातुन काहीही चोरीस गेलेले नाही. या घरफोड्यांमुळे आसनखेडा सह परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे

Protected Content