श्री. स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने हिवरा नदीचा मानसन्मान !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथील श्री. स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने तालुक्यातील हिवरा नदीला साडी, बांगड्या अलंकार, श्रीफळ अर्पण करून मानसन्मान करण्यात आला.

श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपाशीर्वादाने संपूर्ण देशात भरभरून पर्जन्यवृष्टी व्हावी दुष्काळाचे निवारण व्हावे तसेच चांगला पाऊस पडावा यासाठी श्री. स्वामी समर्थ केंद्र, गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या माध्यमातून सेवेकरी प्रत्येक गावाच्या नदीचा गंगादशहरा निमित्त नदीचा मान सन्मान तसेच साडी बांगड्या अलंकार, श्रीफळ अर्पण करून चांगल्या पावसासाठी व शेतकरी सेवेकरी गावकरी सुखी समृद्धी व्हावे म्हणून गंगामाईला साकडं घालत असतात. भारतीय संस्कृतीमध्ये नदीला देवता मानले जाते तसेच परिसरामध्ये पाण्याची उपलब्धता नद्यांमुळे असते त्याची कृतज्ञता म्हणून नदीचा सन्मान करण्याची ही प्रथा आहे. यावेळेस पाचोरा येथील संघवी कॉलनी स्थित दिंडोरी प्रणित अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्रा अंतर्गत ही सेवा रुजू करण्यात आली. यावेळेस केंद्राचे तालुका प्रतिनिधी राम जळतकर, संजय पाटील, भरत गायकवाड, डी. पी. वाणी, बबलू वाणी, बी. एस. पाटील, बी. जे. पाटील, पितृभक्त संदीप साबळे आदी उपस्थित होते. कडे वडगाव येथील संदीप पाटील यांनी व सेवेकाऱ्यांनी पूजा करून घेतली. अतिशय उत्साह मध्ये हा कार्यक्रम पार पडला.

Protected Content