शेवगे बु॥ येथे रक्तदान शिबिर

पारोळा प्रतिनिधी । गणपती उत्सवानिमित्ताने एकता गणेश मंडळ व इच्छापूर्ती गणेश मंडळाच्या सहकार्याने शेवगे बु॥ गावात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी 25 दात्यांनी रक्तदान केले.त्यावेळी उत्तर महाराष्ट्र प्रहार जनशक्ती पक्ष संपर्क प्रमुख अनिल भाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा अध्यक्ष अविनाश पाटील यांच्या सुचणेनुसार रक्तदान केलेल्या सर्व व्यक्तींना प्रहार संघटनेचे तालुका युवक अध्यक्ष व पारोळा शहर अध्यक्ष विजय चौधरी. उर्फ पल्टी भाऊ.. सामाजिक कार्यकर्ते आकाश सोनवणे यांच्यातर्फे पाण्याचे थर्मोस वाटप करण्यात आले.

यावेळी सरपंच भिकूबाई पाटील,ग्रा प सदस्य भूषण पाटील,अनिल पाटील,हरिचंद्र पाटील ग्राम पंचायत शिपाई प्रमोद कोळी,अनिल काशिनाथ पाटील, योगेश कोळी दिनेश पाटील, निलेश पाटील समाधान पाटील महेंद्र पाटील श्याम पाटील प्रशांत पाटील तुषार पाटील यासंह ग्रामस्थ व तरुण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी धुळे येथील निर्णय रक्तपेढीचे सहकार्य लाभले.

 

 

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!