नांद्रा येथे घराचा कडी कोयंडा कापून धाडसी चोरी

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथे बंद घरात प्रवेश करुन ७३ हजार रुपये किंमतीचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना २९ मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली असुन घटने प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नांद्रा येथे २९ मे रोजी मध्यरात्री गं. भा.सविता पाटील (वय – ४५) रा. नांद्रा या शेती व घर काम करणाऱ्या महिला ह्या आपल्या सूनबाई सोबत नांद्रा येथे राहत असून त्यांची दोघे मुले पुण्याला नोकरी निमित्त राहत असल्याने त्यांनी २९ मे रोजी रात्रीचे जेवण करून सुमारे साडेदहा वाजता झोपण्यासाठी त्या व त्यांची सुनबाई आपल्या घराला खाली कुलूप लावून जिन्यावरून घराच्या गच्ची वर झोपायला गेले. परंतु सकाळी ज्यावेळेस ते जिना वरून खाली येण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा त्यांना जिन्याला बाहेरून कोणी तरी कडी लावल्याचे समजले. त्यांनी दुसऱ्या बाजूने घराच्या मुख्य दरवाजावर आल्यावर त्यांना त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोंडा कापून कुलूप तूटलेले दिसले असता घरात प्रवेश केल्यावर त्यांना घरातील गोदरेज कपाटचे तिजोरी उघडी व समान ही अस्ताव्यस्त फेकलेला दिसला. त्यात असलेले २५ हजार रुपये किंमतीचे साडे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे टोंगल, २५ हजार रुपये किंमतीचे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे टोंगल, २ हजार रुपये किंमतीचे अर्धा ग्रॅम वजनाची नाकातील नथ, २० हजार रुपये किंमतीचे ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, १ हजार रुपये किंमतीचे पाच भार वजनाचा चांदीचा गोप असा ७३ हजार रुपये किंमतीचे सोने व चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले. सविता पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल विकास खैरे हे करीत आहे.

Protected Content