बंद शिधापत्रिका सुरु करण्याची मागणी

वरणगाव प्रतिनिधी । वरणगाव येथील असंख्य शिधापत्रिका बंद असून, कार्डधारकांना तातडीने धान्य मिळावे, या मागणीसाठी भाजपने तहसीलदार कार्यालया येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे.

तहसीलच्या कामासाठी वरणगावकरांना वारंवार भुसावळला येणे शक्य नाही, यासाठी वरणगाव येथे स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात यावे या मागणीसाठी भाजपा तर्फे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, सुनील माळी, प्रणिता पाटील, डॉ. प्रवीण चांदणे, साबीर कुरेशी, अरुण बावणे, मिलिंद भैसे, मुस्लिम अन्सारी, इरफान पिजारी, मिलिंद मेढे, आकाश निमकर, पप्पू ठाकरे, संदीप माळी, कृष्णा माळी, नटराज चौधरी, रमेश पालवे, अनिल वंजारी, लखन माळी, संदीप भोई, मयुर गावंडे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले.

यावेळी तहसीलदार धिवरे यांच्या कार्यलयात 1 तास महिलांनी ठिय्या मारला. यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध घोषणा देण्यात आल्या यावेळी तहसीलदार धिवरे यांनी वरणगाव येथे 9व 10 डिसेंबर रोजी वरणगाव येथे शिबिर घेण्याचे सांगितले तसेच बंद रेशन कार्ड वरील धान्य सुरू करून वरणगाव शहरात स्वतंत्र महसूल चे कक्ष उघडण्याबाबत जिल्हाधिकारी साहेबांची परवानगी घेतो असे उपस्थीत आंदोलकांना यावेळी बोलताना सांगितले यावेळी गाजन वाघ राहुल जंजाळे बबलू शहा, कस्तुरबाई इंगळे, आशा साबळे, मुमताजबी शहा, घणा माळी, कोकीलाबाई तांबे, शबा शहा, गोपाळ साबळे, अमोल साबळे, दिनेश साबळे यांच्यासह आदी उपस्थितीत होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content