वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टरवर कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टरवर शहर पोलीसांनी कारवाई केली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शहर पोलीस स्टेशनच्या वतीने स्कीम ऑपरेशन राबविण्यात आले. यादरम्यान शहर पोलिसांचे  पथक शनिवारी पहाटे केसी पार्क परिसरात गस्त घालत असताना विनापरवाना अवैधपणे शासनाच्या नियमांचे पालन न करता एका ट्रॅक्टर मधून वाळूची वाहतूक केली जात असल्याचे समोर आले. पोलिसांनी ट्रॅक्टर पकडले चौकशी केली असता चालकाकडे वाळू वाहतुकीचा कुठलाही परवाना नव्हता. त्यानुसार पोलिसांनी ट्रॅक्टर सह ट्रॅक्टर मधील दीड ब्रास वाळू जप्त केली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक राजकुमार चव्हाण यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर वरील नवदीप कैलास पाटील वय 22 राहणार चंदू आण्णा नगर ,जळगाव व ट्रॅक्टर चे मालक जितेंद्र प्रकाश कोळी वय 27 राहणार नीमखेडी, ता. जळगाव या दोन विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे हे करीत आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!