Home Cities अमळनेर अमळनेरात योग शिबीराचे आयोजन

अमळनेरात योग शिबीराचे आयोजन

0
52


अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी दि. १४ ते २० जून पर्यंत योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

आंतरराष्ट्रीय योग दिवस दि. २१ जून रोजी साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरात सकाळी साडे पाच ते साडे सहा यावेळत योग शिबिर घेण्यात येणार आहे. शहरातील पुढील ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून योग प्रशिक्षक उपस्थित राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे उर्मिला अग्रवाल, पद्मजा पाटील, आशा शिंदे , मराठा मंगल कार्यालयात गजानन माळी, विश्वास बोरसे, युवराज पाटील, आधार महाजन, श्रीराम मंदिर येथे डी. डी. पाटील सर ,मुरलीधर चौधरी, आशिष चौधरी, आर. के. नगर येथे ज्योती पाटील, धुळे रोड जवळील हॉटेल योगेश जवळ-दिलीप बहिरम सर याठिकाणी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. योग शिक्षक मोफत योग धडे देणार आहेत. सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound