पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील मौजे कंकराज येथील धरणात पाणी साठा कमी असल्याने बोरी कालव्यातुन कंकराज धरणात पाणी सोडावे, अशा मागणीसाठी ग्रामस्थ व शेतकरी बांधवांनी आज आ.चिमणराव पाटील यांची भेट घेतली. मागणीची तात्काळ दखल घेत आ. पाटील यांनी कार्यकारी अभियंता, गिरणी पाटबंधारे विभाग, जळगाव यांच्याशी संपर्क साधून बोरी कालव्यातून कांकराज धरणासाठी पाणी सोडण्याबाबत पत्राद्वारे मागणी केली.
यामागणीच्या अनुषंगाने म.कार्यकारी अभियंता यांनी पाणी सोडणे बाबत त्वरीत कारवाई करण्याचे मा.आबासाहेबांना आश्वासित होते. त्याचअनुषंगाने म.कार्यकारी अभियंता यांनी त्वरीत दखल घेत आज २३ आॕगस्ट रोजी कंकराज धरणात बोरी कालव्याव्दारे पाणी सोडण्यात आले. याप्रसंगी शाखाअभियंता अजिंक्य पाटील, व्ही.एम.पाटील, बाजार समितीचे संचालक मधुकरआबा पाटील, प्रेमानंद पाटील उपस्थित होते. धरणात पाणी आल्याचा आनंद व्यक्त करत ग्रामस्थ व शेतकरी बांधवांनी मा.आबासाहेबांचे आभार मानले.