दिलासादायक : जिल्ह्यात दिवसभरात एक बाधित रूग्ण आढळला !

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात १ संक्रमित रूग्ण आढळून आला आहे. तर ३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे. 

आहवालानुसार भुसावळ तालुक्यातील १ बाधित रूग्ण आढळून आला आहे. जिल्हा कोवीड अहवालात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ६८६ रूग्ण आढळून आले त्यापैकी १ लाख ४० हजार ८६ रूग्ण बरे होवून घरी परतले. तर २५ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आजपर्यंत २ हजार ५७५ बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे. 

Protected Content