Home अर्थ निर्वस्त्र अवस्थेत आढळली महिला; प्रतिभा तावडेंकडून तात्काळ मदत

निर्वस्त्र अवस्थेत आढळली महिला; प्रतिभा तावडेंकडून तात्काळ मदत

0
105


वरणगाव प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील आस्वाद हॉटेलच्या समोर एक महिला काटेरी झुडपांमध्ये निर्वस्त्र अवस्थेत आढळून आल्याची बाब प्रहार कार्यकर्तांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रतिभा तावडे यांच्या निर्देशनात आणून दिली. तावडे यांनी तात्काळ त्या महिलेस वस्त्र उपलब्ध करुन आशादीप वस्तीगृहात सुखरुप सोडले आहे.  

दरम्यान, आज सकाळी दहाच्या सुमारास  विजय सोनार व प्रहारचे कार्यकर्ते मयूर चौधरी यांना एक महिला काटेरी झुडपांमध्ये निर्वस्त्र अवस्थेत आढळून आली  त्या तरुणांनी त्या महिलेला  बघितल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते महेश सोनवणे यांच्या ही बाब निदर्शनास  आणून दिली घटनास्थळी महेश सोनवणे पोहोचल्यावर त्यांनी तात्काळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रतिभा तावडे यांना संपर्क साधला असता त्यांनी त्या महिलेला वरणगाव पोलीस स्टेशनला आणलं, संबंधित बाब ही पोलीस अधिकारी संदीप कुमार बोरसे व महिला व बालकल्याण जिल्हा अधीक्षक परदेशी  यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली व त्या महिलेला  प्रतिभा तावडे व  सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कुमार बोरसे यांच्या मदतीने जळगाव आशादीप फाउंडेशन कडे पाठविण्याचे नियोजन लावले  सामाजिक कार्यकर्ते महेश सोनवणे यांनी महिलेसाठी जेवण व कपडे उपलब्ध करून दिले. 


Protected Content

Play sound